Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रोग-प्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवा - रोज फक्त 2 मिनिटांचा सराव | सिंह क्रिया Simha Kriya в хорошем качестве

रोग-प्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवा - रोज फक्त 2 मिनिटांचा सराव | सिंह क्रिया Simha Kriya 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रोग-प्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवा - रोज फक्त 2 मिनिटांचा सराव | सिंह क्रिया Simha Kriya

#SimhaKriya #immunity #health #sadhguru Yoga For Health: A Simple 5-Minute Process For Your Lungs At Home English Video Link -    • Yoga For Health: A Simple 5-Minute Pr...   सिंह क्रिया एक अगदी सोपी योग क्रिया तुमची रोग-प्रतिकारशक्ती आणि तुमच्या फुफुसांची क्षमता वाढविण्यासाठी. या गंभीर प्रसंगात, सद्गुरुंनी देऊ केली आहे एक सोपी क्रिया तुमची रोग-प्रतिकारशक्ती बळकट व तुमची श्वसन यंत्रणा सशक्त करण्यासाठी. सिंह क्रिया साधनेच्या अटी: 1) कृपया ही खात्री करा की तुमचे पोट भरलेले नाही; तुम्हाला थोडीफार भूक लागली असली पाहिजे . म्हणजे सामान्यतः तुमचं जेवण आणि साधना यामध्ये किमान 2 ½ तासाचं अंतर असणं आवश्यक आहे. 2) वय वर्षं 6 ते 70 मधील कोणीही व्यक्ती ही क्रिया करू शकतात, यांच्यासाठी कोणतीही शारीरिक आणि वैद्यकीय स्थितींचं बंधन नाही. साधना करण्याआधी कृपया साधने संबंधित प्रश्नोत्तरे वाचून घ्या. सिंह क्रिया: नेहेमी विचारले जाणारे प्रश्न १. किती वर्षाच्या वरच्या लोकांनी हे करावे? सहा वर्ष. २. हे करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? सत्तर वर्षांपर्यंतचे लोक हे करू शकतात. सहा वर्षाच्या खालील आणि सत्तर वर्षावरील लोक हे करू शकतात, पण त्यांनी श्वासांची संख्या १२ ठेवावी २१ नाही. ३. हा सराव कोण करू शकतं? हा सराव कोणीही करू शकतं. गरोदर स्त्रिया, मासिक पाळी सुरु असणाऱ्या स्त्रिया किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोक किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय समस्या जसे की अस्थमा, मायग्रेन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुफुसाशी संबंधित विकार, ग्लुकोमा, मोतीबिंदू, रेटिना डिटॅचमेंट, हार्निया, इत्यादी. ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूत गाठ असणारे कोणीही ही साधना करू शकतो. पण त्यांनी श्वासांची संख्या १२ ठेवावी २१ नाही. ४. ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी मी ही साधना करू शकतो? मोठे ऑपरेशन असल्यास सहा महिने. छोटे ऑपरेशन सहा आठवडे ५. मी जमिनीवर खाली बसू शकत नाही तरीसुद्धा मीही साधना करू शकतो का? जमिनीवर खाली बसून करणे सर्वोत्तम. तुम्ही बसण्यासाठी उशी किंवा अन्य आधाराचा वापर करून बसणे सोप्पे करू शकता. पण हे करूनही तुम्हाला जमिनीवर बसणे अवघड जात असेल तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता. तुमचे पाय घोट्याजवळ एकमेकांवर ठेवून बसू शकता. हा बसण्यासाठी सर्वोत्तम मार्ग नाहीये आणि यामुळे सराव जितका जमिनीवर बसून होतो तितका प्रभावशाली होत नाही. ६. जेवणानंतर किती वेळाने मी साधना करू शकतो? जेवणानंतर लगेचच साधना करू नका कमीतकमी अडीच तासांचं अंतर ठेवा. ७. ही साधना केल्यानंतर मी लगेच जेवू शकतो का? हो. तुम्ही खाऊ शकता किंवा सामान्य तापमानाला असणारे पेय घेऊ शकता. फ्रीजमधील कोणतीही वस्तू खाण्याआधी दहा-पंधरा मिनिटे वाट पहा. ८. जे व्हिडीओ बघू शकत नाहीत त्यांना मी हा सराव शिकवू शकतो का? नाही. ही क्रिया एक सूक्ष्म विज्ञान आहे. या कठीण काळासाठी तुम्हाला या शास्त्राचे सत्व दिलेले आहे. योग साधनेमध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे योग्यरीतीने इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधारणपणे अनेक वर्षांचं प्रशिक्षण गरजेच असतं. इतरांना ही क्रिया देण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वापरू शकता. जर तुम्हाला ही क्रिया किंवा इतर साधना शिकवण्यामध्ये रस असेल तर टीचर ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी कृपया आम्हाला संपर्क साधा. ९. हा सराव केल्यानंतर मी लगेच आंघोळ करू शकतो का? गरम पाण्याने आंघोळ करण्याआधी सरावानंतर पंधरा-वीस मिनिटे वाट पहा, थंड पाण्याने आंघोळ करण्याआधी २० ते २५ मिनिटे वाट पहा. १०. दिवसभरातून मी हा सराव किती वेळा करू शकतो? दोन ते तीन वेळेला तुम्ही हा सराव व्हिडीओ सांगितल्याप्रमाणे करू शकता. ११. दोन सरावांच्या मध्ये किती वेळाचं अंतर असावं? कमीतकमी चार तासांचे अंतर दोन सरावांमध्ये असायला हवं. १२. हा सराव खूप शक्तिशाली आहे. मी श्वासांची संख्या २१ पेक्षा जास्त करू शकतो का? नाही. हे खूप महत्त्वाचं आहे की सराव ज्याप्रमाणे सांगितलाय त्याप्रमाणेच करायला हवा. सद्गुरु असे म्हणतात कि, जर तुम्ही श्वासांची संख्या वाढवली तर हे तुमच्या प्रणालीसाठी घातक ठरू शकतं. १३. एकदा बसल्यावर मी श्वासांची संख्या २१ पेक्षा जास्त करू शकतो का? दोन किंवा तीन वेळा एकवीस श्वास किंवा जास्त? नाही. १४. जर मला २१ वेळा जमत नसेल तर मी कमी करू शकतो का? हो. तुम्ही १२ वेळा करू शकता. १५. चेहरा थोडा वर उचललेला हवा का? हो. तुमचा चेहरा किंचित वर उचललेला हवा. १६. शेवटच्या स्टेप मध्ये जेव्हा आपण श्वास रोखून धरतो तेव्हा माझे खांदे वर उचललेले हवेत का? हो. १७. मी माझा श्वास ३० सेकंद पर्यंत रोखून धरू शकत नाही तरी सुद्धा मी हा सराव मी करू शकतो का? आणि हळूहळू माझा श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढवू शकतो का? हो. १८. इतर ईशा साधने सोबत हा सराव कोणत्या क्रमाने करावा? यासाठी कुठलाही ठराविक क्रम नाही. १९. हा सराव कुठे करावा आणि काय काळजी घ्यावी याबद्दल काही सूचना आहेत का? कुठलीही विशिष्ट काळजी घेण्याची गरज नाही. फक्त हे पहा की तुमच्या सभोवतालची हवा शुद्ध आहे, जागा स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि हवेशीर आहे. जर खोलीमध्ये इतर लोक असतील तर तुमच्या सभोवताली पुरेशी जागा ठेवा. २०. या सरावानंतर मी झोपू शकतो का किंवा शवासन करू शकतो का? नाही. https://isha.sadhguru.org/in/mr/blog/...

Comments