Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कवडी माळ तुळजा भवानी माळ в хорошем качестве

कवडी माळ तुळजा भवानी माळ 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कवडी माळ तुळजा भवानी माळ

kavadi maal bhavani maal कवडी माळ how to make easy kavadimaal होलसेल कवडी 88880 32878 #कवडीमाळ बनवण्याची सोपी पध्दत या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे ज्यात साधा लाल दोर कॉटन कापड टोकदार चाकूचा वापर केला आहे. •|| कवडी ||• कवडीला लक्ष्मी चे प्रतिक मानले जाते समुद्रातुन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मी शी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मी ची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मी ची उत्पत्ति समुद्रातुन्न झालेली आहे. ✓ कवड्यांचे प्रकार किती व कोणते? तसे पाहता बर्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात. परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो. 1) महालक्ष्मी कवडी कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके. 2) आंबिका बट कवडी खडबडीत व पिवळसर रंगाची 3) येडेश्वरी कवडी राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा 4) यल्लम्मा कवडी शुभ्र व दुधासमान निश्कलंक आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे. ✓ कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले' त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडी कडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण; त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनिंच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणुन देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन ईंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजु घेऊन एका पारड्यात कवडी व दुसय्रा पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेरभांडार खाली झाले ; किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागुन देवराज ईंद्राने स्वत:चा मुकुट देखिल पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीतोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज ईंद्रासह सर्व देव शिव शक्ति समिप आले.अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ ईंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे ईंद्र व चंद्र देवानी बांधले असुन. ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तिर्थांना ईथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तिर्थ होय तेव्हापासुन कवडीला अपार महत्व प्राप्त झाले. ✓ कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग १) बंध्या रुपया बरोबर ३ तपकिरि कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरित ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्या कड़े निरंतर राहील व् दरवर्षी याची लक्ष्मी पूजन च्या दिवशी याची पूजा करावी. २) एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परिक्षे साठी इंटरव्यू साठी जात असाल तर घरा बाहर पड़तांना १ पांढरी कवडी उजव्या खिशांत ठेवावी कार्य यशस्वी होते . ३) नविन वाहना ला काळ्या दोर्यात ओवलेली तपकिरि कवडी दिवे लाग्निच्या वेळी बांधल्यास अपघाता चे भय राहत नाही. ४) दुकानाच्या गल्ल्यात ३,५,७ अश्या विषम संखेत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरु राहतो . ५) लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोर्यात ओउन बांधावी ६) ज्याच्या कड़े लक्ष्मी माते ने पाठ फिरवली आहे अश्या लोकांनी ७ पांढर्या कवडी केशर मिश्रित हलदी चा लेप लावावा व् त्या नव्या कोरया पिवळ्या कापड़ा त गुंडाळून देवार्यात ठेवाव्या लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल ७) काही कारणाने पति पत्नी मधे भांडण होऊंन संसार उध्वस्त होणार असेल तर २१ पांढर्या कवडी ची माळ उशी खाली ठेवावी अल्पावधित वादळ शांत होईल व् जीवन सुखी होईल. ८) लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दांत विना त्रासाने येतात......!! एवढेच काय एके काळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणुन अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातुन निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. आता आराधी लोकांत कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणुन आराधी आजही अनमोल अशा कवड्यासाजाचा शृंगार करतात. त्यांना तो जिवापाड प्रिय आहे. (आम्ही कवडी माळ विकत नाही) . #Aradhimaal #kavdimaal #bhavanimaal #kavadi #कवडीमाळ #रेणुकामाळ #renukamaal #jagnimaal #kavadimaking #genmaal #गेणमाळ #kavadimalamaking #howtomakeeasykavdimaalathome. #sandippachangeofficial #sandippachangeofficial

Comments