Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб महाकेसर आंबा नर्सरी в хорошем качестве

महाकेसर आंबा नर्सरी 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



महाकेसर आंबा नर्सरी

केसर आंबा उत्पादनाच्या विषयात आंबा नर्सरी हा एक कळीचा मुद्दा आहे. कारण उत्कृष्ट मातृ वृक्षापासून त्या त्या परिसरातील गावरान कोईवर किंवा बाठ्यावर केलेली कलम ही उत्कृष्ट कलम असते, असा तज्ञांचा अनुभव आहे. केसर आंबा कलम ही गावरान कोईवरच करायला हवी, कारण त्या त्या परिसरातील वातावरणामध्ये टिकून राहण्याची क्षमता, तसेच वेगवेगळ्या रोग, कीड इत्यादी उपद्रवी घटकांची झगडण्याची आणि त्यांना प्रतिकार करण्याची क्षमता ही त्या त्या परिसरातील गावरान आंब्यामध्येच विकसित झालेली असते. मातृ वृक्ष म्हणून अशी गावरान कोई वापरल्यानंतर त्याचा आपोआपच कलमांना फायदा मिळतो. कलमांचे विषयांमध्ये बागायतदारांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते, असा बागायतदारांचा अनुभव आहे. म्हणून आपण आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून नांदेड व औरंगाबाद अशा दोन ठिकाणी नर्सरी उभारणी करून आणि औरंगाबाद या ठिकाणी प्रारंभी हायटेक नर्सरी या शासकीय मान्यता प्राप्त नर्सरी मध्ये आपण आपल्या मार्गदर्शनानुसार कलम बांधणी करून घेत आहोत. जेणेकरून आपल्या ग्रुप मधील व संबंधित बागायतदारांना फसवणुकीपासून संरक्षण मिळेल. ज्या बागायतदारांना आपल्या स्वतःच्या बागेतील मातृ वृक्षाच्या कलम करून हव्या असतील त्यांना तशी सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत. -- महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, औरंगाबाद. मो. नं. 7737725959 #kesar #mango #nursery #mangonursery #kesarmango #fpc

Comments