Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб घाटवाटांचा पहारेकरी | Story of Harishchandragad | Story on Wheels в хорошем качестве

घाटवाटांचा पहारेकरी | Story of Harishchandragad | Story on Wheels 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



घाटवाटांचा पहारेकरी | Story of Harishchandragad | Story on Wheels

घाटवाटांचा पहारेकरी हरिश्चंद्रगड | Story of Harishchandragad | Story on Wheels हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।महादेओ ॥   एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतोयाचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड.   पौराणिक महत्त्व हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावेअसल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिकदंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्याकेली होती.   गडाचे वर्णन हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतरस्वराज्यात दाखल झाला. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्लामोगलांच्या ताब्यात गेला. १७४७–४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांचीनियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावूनदेण्यात आलेले होते. या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीच्या व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. नाशिककरांसाठी सोईस्कर असा पचनईमार्ग २ तासात तुम्हाला गडावरपोहोचवतो. तसेच मुंबई आणि पुणेकर तुमच्यासाठी उत्तम खिरेश्वर मार्गअसणार आहे. आणि ADVENTURE lovers can use माकडनाळ, नळीची वाट.   पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधताया गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादीवनस्पती येथे आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.   खिरेश्वरकडील वाट खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठीसाधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेजघाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहूनआळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गेखुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंतएस.टी. बसेसचीही सोय आहे. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावरखिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातीलयादवकालीन मंदिर आहे. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेहीम्हणतात. गावातून दोन वाटा गडावर जातात. 1) एक वाट ही तोलार खिंडीतूनसुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते. 2) दुसरी वाट हीगडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आतामात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जातानागावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणीनाही.   तोलार खिंड हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदमभव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी 'यू' आकाराची खिंड आहे. हीखिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगरजिल्ह्यांमधील दुवा आहे.   हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्णशिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्तकळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. हरिश्चंद्रेश्वरमंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्येजाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्यादक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूसदेवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणालाबंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एकागुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितलेजाते.   कोकणकडा गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठेआकर्षण आहे. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडामध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावरझोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवाअसली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातीलसर्वांत उंच कडा आहे. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी),तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडलीअसून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीनेदुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांतकोसळण्याची शक्यता आहे.   तारामती शिखर तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारणतः ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सातलेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाचीभव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहाआहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावरडावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्याचढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. मंगळगंगेचा उगम मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरचएक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामतीशिखरावरून वाहत येतो, ज्याला 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढेही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिणबाजूने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो. धन्यवाद.

Comments