Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб केसर आंबा बागायतदारांची सहविचार सभा-०१ в хорошем качестве

केसर आंबा बागायतदारांची सहविचार सभा-०१ 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



केसर आंबा बागायतदारांची सहविचार सभा-०१

बागातदार बंधुंनो नमस्कार 🙏, काल रविवार, ३० जून २०२४, रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेली पहिली सहविचार सभा दुपारी ४ वाजता पार पडली. या सहविचार सभेला एकूण दहा बागायतदारांनी सहभाग घेत आपापले विचार मांडले. केवळ एक दिवसाची अल्प कालावधीची सूचना, लग्नाची तारीख आणि पाऊस अशा वेगवेगळ्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदारांशी संपर्क झाला नाही. मात्र अतिशय अभ्यासपूर्ण वातावरणात सलग पाच तास विविध विषयावर सविस्तर विचार विनिमय करत स्नेहभोजनाने या सभेची सांगता झाली. या सभेचे आयोजक श्री शिवा मामडे आणि सहभागी झालेल्या सर्व बागायतदारांचे या ठिकाणी आपल्या ग्रुप तर्फे आभार व्यक्त करत आहे.. आपणा सर्वांसाठी विशेष आनंदाची बाब ही आहे की, आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व केसर आंबा बागायतदारांसाठी विचारांचे अनुभवांचे, बागेतील सर्व प्रयोगांचे प्रत्यक्ष भेटून आदान प्रदान करण्यासाठी, तसेच केसर आंबा बागायती सहज, सोपी व किफायतशीर करत, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी करण्यासाठी, आंबा बागायतदारांची सहविचार सभा नियमितपणे सुरू करत आहोत. आपल्या ग्रुपचे सदस्य श्रीयुत. शिवा मामडे, कंधार, यांच्या विनंती वजा सूचनेवरून हा प्रयोग सुरू झाला आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रयोग केला जाणार आहे. या सहविचार सभेचा उद्देश हा आहे की, प्रत्यक्ष बागायतदारांनी समोरासमोर भेटून आपापसात, विचार विनिमय व चर्चा करत योग्य अयोग्य सर्व बाबतीत आंबा बाग व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध विषयांमध्ये प्रत्यक्ष बागेत भेटून विचारांचे आदान प्रदान करणे हे आहे. या प्रयोगाचा सुरुवात श्री शिवा मामडे यांच्या बागेत करण्यात आली. सदरील सहविचार सभेचे सर्व वृत्तांत व्हिडिओच्या माध्यमातून आंबा बागायतदारांसाठी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. --- महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनी, औरंगाबाद. मो. नं. 7737725959 #fpc #mango #kesar #farming #kesarmango #fruit #mahakesar #onlineagri #mangonursery #mangoseason #agriculture #nursery

Comments